Pune Pimpri Chinchwad Crime News | DY Patil हॉस्पिटलमध्ये गुंडाचा धुडगुस ! तरुणावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; नाकावर बुक्का मारुन हाड फ्रॅक्चर
पुणे : Pune Pimpri Chinchwad Crime News | पहिल्यावरुन जिन्याने जात असताना हातातील जेवणाच्या डब्याचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोघा गुंडांनी तरुणावर चाकूने वार (Stabbing Case) करुन नाकावर बुक्का मारुन हाड फॅक्चर करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. ही घटना डी वाय पाटील हॉस्पिटलमधील पहिल्या मजल्यावर २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता घडला होता.
याबाबत रोहित हिंदुराव रकटे (वय २८, रा. रुपेश कॉलनी, दत्तवाडी, आकुर्डी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित ओव्हाह, आदित्य यादव (दोघे रा. आकुर्डी) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आजोबा यांच्यावर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांना जेवणाचा डबा घेऊन फिर्यादी पहिल्या मजल्यावरुन जिन्याने दुसर्या मजल्यावर जात असताना जेवणाच्या डब्याचा धक्का फिर्यादी रहात असलेल्या परिसरातील मुलगा रोहित ओव्हाळ याला लागला. तेव्हा त्याचे सोबत असलेला आदित्य यादव याने फिर्यादीला शिवीगाळ करुन चापट मारली. त्यावेळी रोहित ओव्हाळ बोलला की तू मला ओळखत नाही का, तु आम्हाला जाणून बुजून धक्का दिला आहेस, आम्ही आकुर्डीचे भाई आहोत, तुला आमची भिती नाही का, तुला आज जिवंत सोडत नाही, असे म्हणून त्याने त्याच्या पँटमध्ये लपवलेला लांब चाकू काढून फिर्यादीच्या गळ्यावर मारला असता फिर्यादीने तो चुकवला.
तेव्हा आदित्य याने नाकावर जोरात हातातील फायटरने बुक्का मारुन नाकाचे हाड फ्रॅक्चर केले.
तसेच रोहित याने फिर्यादीचे केसांना पकडून गालावर जोरात त्याचा पायाचा गुडघा मारुन गालाचे हाड फ्रॅक्चर करुन छातीत गुडघा मारला.
त्यानंतर रोहित याने त्याच्या हातातील चाकू हवेत फिरवून तेथे जमा झालेल्या लोकांकडे बघुन म्हणाला की आम्ही भाई आहोत,
आमच्याशी जो नडेल, त्याची अशी अवस्था करु असे बोलला असता तेथे जमलेले लोक तेथून पळू लागले.
तेव्हा आदित्य यादव याने फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देऊन तेथुन निघून गेले. पोलीस निरीक्षक आव्हाड तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा