Pune Pimpri Chinchwad Crime News | ऑनलाईन गेममध्ये हरल्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा शिकला बुलेट चोरी करायला; त्याच्या बरोबरच्या दोन बी. टेक. च्या विद्यार्थ्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करुन बाईक विकल्या

Chakan Police

२६ लाखांच्या ११ बुलेट, ६ स्पेंडर, १ यामाहा जप्त

पुणे / पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | त्याला ऑनलाईन गेम (Online Game) खेळण्याचा नाद लागला होता. त्यात तो मोठी रक्कम हरला. ऑनलाईन गेममधील नुकसान भरुन काढण्यासाठी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या या २३ वर्षाच्या विद्यार्थ्याने यु ट्युबवर चोरी करण्याचे पाहिले. त्यातून त्याने रॉयल एनफील्ड बुलेट बाईकची चोरी करायला सुरुवात केली. (Arrest In Vehicle Theft)

अभय सुरेश खर्डे (वय २३, रा. झोळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याला चोरीच्या गाड्या विकण्यासाठी मदत करणारे रवींद्र निवृत्ती गव्हाणे (वय २३, रा. आंजनापूर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), शुभम बाळासाहेब काळे (वय २४, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), यश नंदकिशोर थुट्टे (वय २२, रा. चिखली, जि. बुलढाणा, सध्या रा. अशोकनगर, नाशिक), प्रेम भाईदास देवरे (वय २०, रा. अशोकनगर, नाशिक) यांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय खर्डे याला ऑनलाईन गेम खेळण्याचे वेड होते. गेम खेळून गमावलेले पैसे परत मिळविण्यासाठी तो चोरी करु लागला. दुचाकी कशी चोरी करायची हे तो यु ट्युबवरुन शिकला. बुलेट हिला चांगली मागणी आणि जास्त पैसे मिळत असल्याने त्याने रॉयल एनफिल्ड बुलेट चोरण्याकडे जास्त लक्ष वळविले.

शहरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये बुलेट चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी वाहन चोरट्यांचा माग करण्याचा प्रयत्न केला. चाकण परिसरातून चोरी झालेल्या बुलेटच्या शोधासाठी पोलीस १५० सीसीटीव्ही फुटेज तपासत संगमनेरपर्यंत पोहोचले. तेथे अभय याला ताब्यात घेतले़ त्याने चाकण परिसरातून १८ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

तो बाईकचे लॉक तोडून चोरी करत. त्यानंतर त्या विविध ठिकाणी नेऊन विकत असे. त्याच्याबरोबरच्या दोन बी टेक विद्यार्थ्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करुन या बाईकची विक्री केली. त्यामुळे ते पुण्याबाहेरील इच्छुक खरेदीदारांपर्यंत पोहचले होते.

पुन्हा गेममध्येच हरला

अभय खर्डे याला ऑनलाईन अ‍ॅवेटर गेम खेळण्याचा नाद होता. या ऑनलाईन गेममध्ये तो यापूर्वी खूप पैसे हारला होता. पैसे कमविण्यासाठी त्याने व साथीदारांनी महागड्या बुलेट गाड्या चोरी करुन पैसे मिळविले. हे पैसे पुन्हा ऑनलाईन गेमध्ये हरले आहे़.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिंकात महावरकर, अपर आयुक्त, वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाथा घार्गे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे, पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुनील शिंदे, शिवाजी चव्हाण, राजु जाधव, ॠषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, सुनील भागवत, महेश कोळी, महादेव विक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरनार, नितीन गुंजाळ, किरण घोडके, माधुरी कचाटे यांच्या पथकाने केली.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

Congress Leader Mohan Joshi | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed