Pune Pimpri Chinchwad Crime News | फटाके इथे नाही बाजूला जाऊन फोडा ! सांगणार्‍याला चौघांनी लाकडी फळी डोक्यात घालून केले जखमी

marhan

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | रस्त्यावर फटाके फोडू नका, बाजूला फोडा, असे सांगितल्याच्या कारणावरुन चौघांनी एका कारचालकाला बेदम मारहाण (Marhan) केली. त्यांच्या डोक्यात लाकडी फळी मारुन जखमी केले.

याबाबत ऋषिकेश अरुणकुमार भैसारे (वय २६, रा. महालक्ष्मी कॉलनी, दिघी, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक लक्ष्मण कांबळे (वय २३, रा. आदर्शनगर, दिघी, ता. हवेली) आणि राहुल देवीदास जाधव (वय २३, रा. सावंतनगर कॉलनी, दिघी, ता. हवेली) यांना अटक केली आहे. आदर्श मगर (वय २४, रा. महादेवनगर, दिघी) आणि राज रनित (वय २२, रा. महादेवनगर, दिघी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दिघीमधील सावंतनगर ते ममता चौक रस्त्यावर तुळजाभवानी खानावळीसमोर बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाके उडविण्यास रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी आहे. तरीही रात्री साडेअकरा वाजल्यानंतरही हे चौघे फटाके वाजवत होते. फिर्यादी हे पोलो कारमधून जात होते. तेव्हा रस्त्यावर फटाके फोडणार्‍या या मुलांना त्यांनी तुम्ही रस्त्यावर फटाके फोडू नका, बाजूला जाऊन फटाके फोडा, असे सांगितले. या कारणावरुन त्यांचा राग करुन मुले तेथेच फटाके फोडू लागले.

राहुल जाधव याने तेथील बॅनरच्या फेमची लाकडी फळी काढून फिर्यादी यांच्या डोक्यात मारली. इतरांनी फिर्यादींना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचा मोबाईल रस्त्यावर आपटून नुकसान केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर दोघांचा शोध घेतला जात आहे. पोलीस हवालदार जाधव तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yerawada Pune Crime News | पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन केले जखमी; येरवड्यातील घटना (Video)

PI Girish Sonawane | निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकरच्या 500 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ताबाबत सर्वोत्कृष्ट तपासाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता सुवर्ण पदक पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे यांना जाहीर

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वाढतोय तरुणाईचा कल ! बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्ष प्रवेश

You may have missed