Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकीला धक्का का दिला विचारणा केल्याने टोळक्याने खाली पाडून केली मारहाण
तरुणाला रक्ताची लघवी, मित्रालाही मारहाण करणारे चौघे जेरबंद
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकीला धक्का दिल्याने विचारणा केल्यावरुन टोळक्याने तरुणाला व त्याच्या मित्राला खाली पाडून बेदम मारहाण (Marhan) केली. त्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तरुणाला रक्ताची लघवी झाली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. (Attack On Youth)
ओम संजय दळवी (वय २२), ओंकार शरद आवंदे (वय २४), गणेश गोरख कुंभार (वय २६), प्रितेश पांडुरंग जाधव (वय २१, सर्व रा. सिद्धीविनायक नगरी, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या २ साथीदारांवरही खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चंद्रकांत दत्ता बुटे (वय ३८, रा. राधेकृष्ण निवास, आकुर्डी गावठाण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरमधील स्वागत हॉटेल येथे ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावयायिक आहेत. आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीला धक्का दिला. तेव्हा फिर्यादी यांनी दुचाकीला धक्का का दिला अशी विचारणा केली. तेव्हा ओम व ओंकार यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. त्याचे इतर मित्र गणेश, प्रितेश व इतरांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करुन “आज चंद्याला जिवंत सोडायचा नाही, लय माज आलाय” असे म्हणून फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने हाताने लाथाबुक्क्यांनी डोक्याला,
डोळ्याला, दोन्ही बरगड्यांवर खाली रोडवर पाडून पोटावर लाथा मारल्या.
त्यामुळे फिर्यादी यांना अंर्तगत रक्तस्त्राव झाल्याने रक्ताची लघवी झाली.
फिर्यादी यांचा मित्र आशिष यालाही त्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले.
पोलीस उपनिरीक्षक शिर्के तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली;
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन