Pune Pimpri Chinchwad Crime News | टेंडरमध्ये गुंतवणुकीवर 20 टक्क्यांच्या परताव्याच्या आमिषाने साडेचार कोटींना गंडा; केंद्र सरकारच्या अवजड उद्योगात संचालक असल्याचे भासविले

Fraud

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयात संचालक म्हणून निवड झाल्याचे भासवून टेंडरमध्ये गुंतवणुक केल्यास महिना २० टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवून (Lure Of Good Returns) एका व्यावसायिकाला साडेचार कोटींना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)

याप्रकरणी संजय रामचंद्र हजारे (वय ५०, रा. मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओंकार श्यामराव जोशी Omkar Shyamrao Joshi (रा. पिंपळे सौदागर) आणि सदाशिव नामदेव पुंड Sadashiv Namdev Pund (रा. मोशी)यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मोशी आणि नाशिक फाटा येथील अशोका हॉटेलमध्ये २५ फेब्रुवारी २०२१ पासून सप्टेंबर २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून आरोपींनी संगनमत करुन फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांना एमआयडीसीतील विविध कंपन्यांचे, कॉर्पोरेट लायसन्स, व्हेंडर कोड काढून देणे, तसेच कंपन्यांचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखविले. या टेंडरमध्ये गुंतवणूक केल्यास महिना २० टक्क्यांपर्यंत आकर्षक नफा व परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखविले. ओंकार जोशी याने तो सेंट्रल मिनिस्ट्रीतील कर्मचारी असल्याचे सांगितले.

पुणे विभागातील एमआयडीसीतील कंपन्यांवर त्याचा प्रभाव असल्याचे भासवले. त्यानंतर काही दिवसांनी त्याची केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयात संचालक म्हणून निवड झाल्याचे सांगून विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून १० कोटी ५८ लाख ५० हजार रुपये गुंतवणूकीसाठी घेतले. प्रत्यक्षात ही रक्कम टेंडरमध्ये न गुंतवता तसेच कंपन्यांचे व्यापारी परवाने व व्हेंडर कोड काढण्यासाठी वापरली नाही. फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला नफा म्हणून २ कोटी ५० लाख, २ कोटी २५ लाख रुपये असे एकूण ४ कोटी ७५ लाख ६५ हजार रुपये दिले. तसेच मुद्दल १ कोटी १६ लाख रुपये आणि समजुतीचा करारनाम्यानुसार २५ लाख ५० हजार रुपये असे एकूण ६ कोटी १७ लाख १५ हजार रुपये परत केले. उर्वरीत ४ कोटी ४१ लाख ३५ हजार रुपये व परताव्याची रक्कम परत न करता फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान भुयारकर तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed