Pune Pimpri Chinchwad Crime News | धक्कादायक| मोबाईल गेमिंगच्या नादातून मुलाने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

addiction of mobile games

पिंपरी: Pune Pimpri Chinchwad Crime News | किवळे (Kiwale Pune) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मोबाईल गेमिंगच्या (Mobile Gaming App) नादातून एका १५ वर्षीय मुलाने जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून त्याने उडी मारून त्याने आत्महत्या केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

किवळे येथील उच्चभ्रू हाऊसिंग सोसायटीत ही घटना घडली. मुलाचे वडील कामानिमित्त परदेशात असतात. तर आई गृहिणी आहे. इयत्ता नववीमध्ये शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला मुलगा अभ्यासात अत्यंत हुशार होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून तो मोबाईल गेमच्या नादी लागला. लॅपटॉपवर तो गेम खेळायचा.

त्यातून तो एकटाच राहात असल्याने वडील मायदेशी परतले. त्यावेळी तो पुन्हा सर्वांमध्ये मिसळून पूर्वीप्रमाणे वावरत होता. दरम्यान वडील नोकरीनिमित्त पुन्हा परदेशी गेल्यानंतर तो पुन्हा गेमच्या आहारी गेला. त्यातून तो स्वतःला त्याच्या खोलीत कोंडून घेत होता. खोलीत एकटाच बडबड करत असायचा.

अतिवृष्टीमुळे २५ जुलैला शाळांना सुट्टी होती, तो दिवस त्याने गेम खेळण्यात घालवला. रात्री विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यानंतर पुन्हा तो खोलीत गेला. लहान मुलाला ताप आल्याने त्याची आई चिंतेत होती. रात्रीचा एक वाजला तरी देखील मुलाचा ताप उतरेना, त्यामुळे आई जागीच होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एक मेसेज आला.

एक मुलगा जखमी अवस्थेत खाली पडल्याचा उल्लेख मेसेजमध्ये होता. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला. ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा खोलीत नव्हता. त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुला जवळ पोहचली. जखमी अवस्थेत पडलेला मुलगा तिचाच होता.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या मुलाला पाहून, आईची पायाखालची जमीन सरकली. मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले. पण त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेलं काहीतरी आढळलं. मात्र यातून त्याला काय नमूद करायचं होतं, याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेबाबत माहिती मिळताच मुलाचे वडील परदेशातून परतले.

” किवळे येथे ही घटना घडली. मुलगा एकलकोंडी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा प्रकार नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरु आहे “, अशी माहिती रावेत पोलीस स्टेशनचे (Ravet Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम (Sr PI Mahendra Kadam) यांनी दिली आहे.

आर्य श्रीराव अस त्या मुलाचं नाव आहे. आर्य श्रीराव हा अत्यंत लाजाळू आणि अभ्यासू मुलागा चिंचवड मधील नामांकित स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’

You may have missed