Pune Pimpri Chinchwad Crime News | हप्ते द्या नाही तर दुकाने फोडून टाकेन ! गुंडाची दुकानदारांना धमकी
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | चाकण मधील (Hafta Vasuli In Chakan) कपडे दुकान, सलून दुकानदारांना मारहाण करुन त्यांना हप्ते द्या, नाही तर दुकाने फोडून टाकेन, अशी धमकी गुंडाने दुकानदारांना दिली आहे.
याप्रकरणी सुनिल नारायण गेहलोत (वय३६, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किरण कचर पवळे (वय२३, रा. महात्मा फुले चौक, चाकण) याच्यावर खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल केला आहे. प्रकार महात्मा फुले चौकात गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कापड दुकान आहे. किरण पवळे हा दुकानात आला व टी शर्ट दाखवायला सांगितले. ते टी शर्ट दाखवत असताना त्याने फिर्यादींना अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तू मला ओळखतो का? तुझे सगळे दुकान फोडून टाकेन. उद्यापासून मला हप्त्याचे पैसे चालू करायचे नाही तर तुला सोडणार नाही़
असे म्हणून फिर्यादींच्या तोंडावर बुक्क्या मारल्या. त्यांच्या कामगारालाही तुलाही मारुन टाकेन, अशी धमकी दिली.
फिर्यादी हे तक्रार देण्यास पोलीस चौकीत जात असताना वाटेत त्याने ब्लॅक झोन हेअर अँड स्पा
या सलून दुकानाचे मालक प्रकाश श्रीवास्तव यांनाही त्याने हप्त्यासाठी धमकाविले असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक बुरुड तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा