Pune Pimpri Chinchwad Crime News | मोटारसायकल पाडल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार करुन केले जखमी

marhan

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | उभी असलेली मोटारसायकल लाथ मारुन पाडल्याने त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने (Koyta Attack) वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी शरद विलास ढोरे (वय ३७, रा. कुरकुंडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आकाश ऊर्फ गणेश दत्तु काळे (रा. कुरकुंडी, ता. खेड) याला अटक केली आहे. हा प्रकार कुरकुंडी गावातील विठ्ठल मंदिराजवळील नितीन गांधी यांच्या किराणा दुकानासमोर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी नितिन गांधी यांच्या किराणा दुकानासमोर आपली मोटारसायकल उभी केली होती. आकाश काळे हा तेथे आला व त्याने मोटारसायकलला लाथ मारुन ती खाली पाडली. हे पाहून फिर्यादी यांनी माझी मोटारसायकल का पाडली असे विचारले.
या कारणावरुन त्याने फिर्यादीचे शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्याने कमरेला खोचलेला कोयता बाहेर काढून फिर्यादीचे डाव्या खांद्यावर, पाठीवर, उजवे बाजूस,
डावे हाताचे तळहातावर वार करुन गंभीर जखमी केले. पोलीस हवालदार दिघे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

You may have missed