Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : बनावट आधारकार्ड तयार करुन तरुणीचे दोघांसोबत लग्न, आळंदीत पाच जणांवर गुन्हा

marrid

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | तरुणीचे बनावट आधारकार्ड (Fake Aadhaar Card) तयार करुन तिचे दोन तरुणांसोबत लग्न लावून देत फसवणूक केली (Cheating Fraud CAse). याप्रकरणी तरुणीसह पाच जणांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील आळंदी येथील पोपळे मंगल कार्यालय आणि वाघोली येथे गुरुवारी (दि.4) घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

राहुल दशरत कनसे (वय- 37 रा. त्रिवेणी नगर, तळवडे, मूळ रा. भांडवली, ता. माण, जि. सातारा) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 5) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ज्योति रविंद्र पाटील उर्फ ज्योती धनंजय लोंढे, भावेश रवींद्र पाटील, ज्योती पाटीलचे आई-वडील आणि त्यांची मुलगी निशा दत्ताराम लोखंडे (रा. विलेपार्ले, मुंबई) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (भा. न्या. सं.) कलम 318(2), 319(2), 318 (4), 336(3), 340(2), 3(5) प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन मुलगी निशा लाखंडे हिचे चैतन्य खांडे यांच्यासोबत लग्न लावून देऊन चैतन्य यांच्याकडून पैसे घेतले. तसेच निशा हिचे बनावट आधारकार्ड तयार करुन त्याच्या आधारे फिर्यादी राहुल कनसे यांना तिचे नाव निशा दत्तराम पाटील असे असल्याचे भासवले. त्यानंतर फिर्यादी राहुल यांचा भाऊ सुनील कनसे यांच्यासोबत निशा हिचे लग्न लावून दिले.

त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून एक लाख 55 हजार रुपये रोख तर 95 हजार भावेश रवींद्र पाटील
याच्या खात्यावर स्वीकारले. यात आरोपींनी संगनमत करुन तोतयेगिरी करुन ठकवणूक केली.
तसेच दोन लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!

Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)