Pune Pimpri Chinchwad Crime News | तडीपार गुंड खुशाल फिरताहेत शहरात खुलेआम ! एकाच दिवशी दोघा तडीपारांना पकडले

Tadipar-pune Police

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले असतानाही गुंड त्या आदेशाला न जुमानता खुशाल शहरात फिरत असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) एकाच दिवशी तडीपार केलेल्या दोघा गुंडांना कोयता घेऊन फिरताना पकडले. (Tadipar Criminal Arrested)

https://www.instagram.com/p/DAbMBpopUbs

अर्जुन ज्ञानदेव मडके (वय २३, रा. श्रीनाथ रेसिडेन्सी, भुगाव) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. अजुृन मडके याला पिंपरी चिंचवड, पुणे शहर व जिल्ह्यातून १७ जून २०२४ रोजी एक वर्षासाठी तडीपार केले आहे. असे असताना तो कोणतीही परवानगी न घेता बावधन येथील नॅचरल आईस्क्रीम येथे आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला जाऊन पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले (API Prashant Mahale) तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAbAVC8pREH

अमर राघु टेमघरे (वय २३, रा. भाऊ कॉम्प्लेक्स, भुगाव) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. अमर टेमघरे याला २१ जून २०२४ रोजी एक वर्षासाठी पिंपरी चिंचवड, पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. असे असताना तो बापुजीबुवा मंदिर येथे थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन खात्री केली असता पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी काही अंतरावर त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

https://www.instagram.com/p/DAa1PdwJBKk

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’