Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: मालाची थकबाकी न देता 48 लाखांची फसवणूक, पाच जणांवर FIR
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | कंपनीकडून विकत घेतलेल्या मालाची थकबाकी न देता 47 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक केली (Cheating Fraud Case). तसेच पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर महिलेसोबत असभ्य वर्तन (Rude Behavior) करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 16 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास टेल्को रोडवरील (Telco Road Pimpri) एम.बी. क्लासीक येथील आर.आर. वायर्स अँड केबल्स दुकानात घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत निगडी येथे राहणाऱ्या 51 वर्षीय व्यक्तीने यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित सतपाल मित्तल (Rohit Satpal Mittal), रेणु सतपाल मित्तल (Renu Satpal Mittal), प्रियंका रोहित मित्तल (Priyanka Rohit Mittal), राहुल सतपाल मित्तल (Rahul Satpal Mittal), सतपाल मित्तल Satpal Mittal (सर्व रा. मुर्ती दर्शन, सेक्टर नं.27. निगडी प्राधिकरण, पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 406, 354 (अ), 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या स्कायलाईन कॉम्प्युटर्स
या फर्म कडून लॅन केबल खरेदी केली.
खरेदी केलेल्या मालाची 47 लाख 88 हजार 792 रुपये थकबाकी न देता आरोपींनी फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. थकबाकी मागण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या पत्नी सतपाल मित्तल याच्या दुकानात गेले होते. त्यावेळी सतपाल याने फिर्यादी यांच्या पत्नीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला. तसेच तुम्हाला कोठे जायचे तिकडे जा. थकबाकी मिळणार नाही व देणार पण नाही. मी जर जुना सतपाल बनलो तर पुढे तुम्हाला कठीण जाईल, अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक