Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Pimpri Crime-delivery boys

पुना व्हिले सोसायटीतील घटना, ७ डिलेव्हरी बॉयना अटक

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | सोसायटीचे पॅसेजर लिफ्टचा वापर करण्याऐवजी सर्व्हिस लिफ्टचा वापर करण्यास सांगितल्याने डिलेव्हरी बॉयने साथीदारांना बोलावून सुरक्षारक्षकाला मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)

https://www.instagram.com/p/C_nXnH1JNHc

याप्रकरणी मोहम्मद अश्रफ मोहम्मद शफी (वय २७, रा. पुनावळे, मुळ गाव जम्मू काश्मीर) यांनी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मारुती परसराम वराडे (वय २०, रा. चव्हाणवस्ती, जांबे), केदार जितेश बनसोडे (वय १९, रा. वाकड), गोपाळ सिद्धेश्वर बोरावडे (वय २६, रा. पुनावळे), प्रियंकसिंग सुरेंद्रसिंग तोमर (वय २३, रा. हिंजवडी), सुनिल विठ्ठल गवळी (वय २०, रा. जांबे) आणि सुनिल सिद्धु बोधणे (वय २०, रा. मामुर्डी, ता. मावळ) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना पुनावळे येथील व्हिले सोसायटीत शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्हिले सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. झेप्टो कंपनीचे डिलेव्हरी बॉय मारुती वराडे हा सोसायटीत डिलेव्हरी देण्यासाठी आला होता. तेव्हा फिर्यादी यांनी सोसायटीचे पॅसेंजर लिफ्टचा वापर न करता सर्व्हिस लिफ्टचा वापर करण्यास सांगितले. त्यावर दोघांमध्ये लिफ्टमध्येच वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण केली. त्यानंतर मारुती वराडे याने चिडून जाऊन फिर्यादीस “तुम रुको और देखना हमे क्या करते है,” असे धमकी देऊन तो निघून गेला. काही वेळाने तो झेप्टो कंपनीच्या १५ ते २० जणांना घेऊन आला.

मारुती वराडे फिर्यादीला म्हणाला की “आज याला संपवूनच टाकतो,” असे म्हणून वराडे व केदार बनसाडे यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन फिर्यादीस गंभीर जखमी केले. इतर ५ ते ६ जणांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी आलेले सुपरवायझर प्रभाकर पांडे यांना दगडाने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच एरिया सुपर वायझर ज्ञानदेव भोगील, सिक्युरिटी गार्ड मेहबुब शेख यांनाही टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed