Pune Pimpri Chinchwad Crime News | तडीपार गुंड पिस्तुल घेऊन बिनधास्त पिंपरीत होता वावरत; पोलिसांनी केली अटक
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | तडीपार केले असतानाही शहरात प्रवेश करुन पिस्तुल बाळगून बिनधास्त फिरणार्या गुंडाला संत तुकारामनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. (Tadipar Criminal Arrested With Pistol)
पंकज दिलीप पवार (वय ३२, रा. अण्णासाहेब मगर झोपडपट्टी, पिंपरी) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार जावेद शहाबुद्दीन मुजावर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज पवार याच्या वाढत्या गुंडगिरीमुळे त्याला पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी १२ फेब्रुवारी २०२४ पासून दोन वर्षासाठी पिंपरी चिंचवड, पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असताना तो तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन शहरात आला.
चिंचवड एम आय डीसी मधील काला ग्रुप कंपनीचे पाठीमागील सध्या बंद असलेल्या बी आर टी रोडचे डेड एंडला पंकज पवार हा थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळून आले. पोलीस उपनिरीक्षक जिनेडी तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा