Pune Pimpri Chinchwad Crime News | तोतया भक्ताने मंदिरालाच घातला गंडा ! जादा देणगी दिल्याचे भासवून केली फसवणूक
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | आपली मनोकामना पूर्ण झाली अथवा मनासारखे काम झाले तर अनेक जण देवाच्या नावाने देणगी देत असतात. एका भक्ताने मंदिराला देणगी द्यायची असल्याचे सांगून माहिती घेतली. त्यानंतर मंदिराला देणगी देताना जादा रक्कमेची एन ई एफ टी केली, असे भासवून मंदिर ट्रस्टच्या दुकानातून वस्तू खरेदी करुन चक्क मंदिराची फसवणूक केली. निगडी पोलिसांनी (Nigdi Police) या तोतया भक्ताला अटक केली आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत कृष्ण पिलाई राधाकृष्णन (वय ७७, रा. सुखवानी कॅम्पस, वल्लभनगर, पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रथम शहा नावाच्या चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षात त्याचे नाव विनय राजेश लोहिरे (वय ४०, रा. मांजरी) असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रकार निगडी गावठाण येथील श्रीकृष्ण मंदिरात ४ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मंदिराच्या कार्यालयात असताना आरोपी तेथे आला. प्रथम शहा असे नाव सांगणार्या आरोपीने मंदिराकरीता ४ लाख रुपयांची देणगी देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने ट्रस्टचे बँक खाते नंबर व फिर्यादीचा मोबाईल नंबर घेतला. काही वेळाने त्याने मंदिर ट्रस्टच्या बँक खात्यावर एन ई एफ टी द्वारे ४ लाख ३० हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत, असा खोटा मेसेज फिर्यादीच्या मोबाईलवर पाठविला.
चुकून ३० हजार रुपये जादा पाठविले गेले आहेत, असे सांगितले. त्यानंतर त्याने जादा पाठविलेल्या रक्कमेच्या पैशातून मंदिर ट्रस्टचे दुकानातून २५ हजार ७७९ रुपयांची पितळी पुजा साहित्य घेऊन फसवणूक करुन तो निघून गेला. त्यानंतर हिशोब पाहिले असता मंदिर ट्रस्टच्या बँक खात्यात ४ लाख ३० हजार रुपयांची कोणतीच देणगी आली नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली.
तपास अधिकारी सहायक फौजदार आनंद साळवी यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त होताच तांत्रिक विश्लेषणातून हा गुन्हा विनय लोहिरे याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?