Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रसिद्ध बैलगाडा मालकाचे अपहरण करुन खून ! वैयक्तिक कारणावरुन खून करुन खंडणीसाठी अपहरण केल्याचे भासवले (Video)
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मावळ तालुक्यातील (Maval Crime News) प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडीत जाधव (Pandit Jadhav Murder Case) यांचे अपहरण (Kidnapping Case) करुन त्यांचा खुन केला. त्यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावून खंडणीचा बनाव करणार्यास पोलिसांनी त्याला पकडले आहे. (Pimpri Chinchwad Police)
https://www.instagram.com/reel/DCqYZHAJFVH/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
पंडीत रामचंद्र जाधव (वय ५२, रा. जाधववाडी डॅमजवळ, नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे खुन झालेल्या बैलगाडा मालकाचे नाव आहे. सुरज मच्छिंद्र वानखेडे (वय २३, रा. पंडीत जाधव यांचे खोलीत, जाधववाडी, नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे खुन करणार्याचे नाव आहे. (Pimpri Chinchwad Crime Branch)
खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (PI Devendra Chavan) यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली की, पंडीत जाधव हे १४ नोव्हेबर पासून बेपत्ता असून अज्ञात लोकाने त्यांच्या नातेवाईकांकडे पंडीत जाधव यांच्या व्हाटसअॅप नंबरचा वापर करुन त्यांचे नातेवाईकांकडे ५० लाख रुपयांची खंडणीची मागणी करीत आहे. ही माहिती समजल्यावर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन माहिती घेतली. पंडीत जाधव यांच्या बंद मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन सीसीटीव्ही चेक केले.
तसेच बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन सुरज वानखेडे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यावरुन मुळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सुरज वानखेडे व त्याचा मित्र रणजित कुमार (रा. बिहार) यांचा पकडले. त्यांच्या चौकशीत खरा प्रकार समोर आला. सुरज वानखेडे हा पंडीत जाधव यांच्या शेजारीच रहात असे. त्यांच्यात वैयक्तिक कारणावरुन वाद होता. त्यावरुन सुरज याने १४ नोव्हेबर रोजी तळेगाव एमआयडीसी परिसरात वैयक्तिक कारणावरुन पंडीत जाधव यांचा दोरीने गळा आवळून खुन केला. पंडीत जाधव यांनी गाडी मागितली आहे,
असे कुटुंबीयांना भासवून त्यांच्या गाडीमध्ये पंडीत यांचा मृतदेह टाकून तो खेड तालुक्यातील वहागाव येथील डोंगरावर नेला. मृतदेह तेथे जाळून टाकून त्याची विल्हेवाट लावली. गाडी पुन्हा त्यांच्या घराचे परिसरात लावली. त्यानंतर पंडीत जाधव यांच्या व्हॉट्सअॅपवरुन अपहरण केल्याचे व ५० लाख रुपयांची खंडणी मागणारा मेसेज नातेवाईकांना केला होता.
खंडणी विरोधी पथकाकडून हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले पाच सीमकार्ड व दोन मोबाईल जप्त केले आहेत.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खून करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस हवालदार सुनिल कानगुडे, प्रदिप पोटे, किरण काटकर, प्रदिप गोंडाबे, किशोर कांबळे, किरण जाधव, अशिष बोटके, चंद्रकांत जाधव व तांत्रिक विश्लेषन विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pashan Pune Crime News | मनी लॉड्रिंगच्या नावाने आय टी इंजिनिअरची 6 कोटी 29 लाख रुपयांची
फसवणूक; डिजिटल अरेस्ट करुन सीबीआयच्या नावाने घातला गंडा
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित
राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी
‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट