Pune Pimpri Chinchwad Crime News | वडिलोपार्जित घराच्या वाटणीपत्रावरुन लहान भावाने डोक्यात रॉड मारुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न

marhan

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | वडिलोपार्जित घराच्या वाटणीपत्रावरुन लहान भावाने मोठा भाऊ व वहिनीच्या डोळ्यात मिरची पुड टाकून डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अरविंद मोहन खोलीया (वय ५५, रा. साईनाथनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वल्लभ मोहन खोलीया (वय ५३, रा. साईनाथनगर, निगडी) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार निगडीतील साईनाथनगरमधील शिवशंभो कॉलनीत शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरविंद व त्यांची पत्नी हे सकाळी मंदिरात गेले होते. मंदिरामधून देवदर्शन घेऊन घराचे गेटजवळ आले. गेट उघडत असताना त्यांचा भाऊ वल्लभ तेथे आला़. त्याच्यात यापूर्वी वडिलोपार्जित घराचे वाटणीपत्रावर भांडणे झाले होते. या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन त्याने आपल्या मोठ्या भावाला तुम्हाला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून फिर्यादी व त्यांची पत्नी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोळ्यात मिरची पुड टाकली. लोखंडी रॉडने दोघांना मारहाण करुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक आजगेकर तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed