Pune Pimpri Chinchwad Crime News | रस्त्याने जाताना वीजेची तार अंगावर पडून दोघे जण जखमी ! महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | Seeing that a young woman living in a PG was getting more and more, the owner tried to take advantage of her; Police registered a case of molestation

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मोटारसायकलवरुन रस्त्याने जात असताना महावितरणची २२ के व्हीची तार तुटून अंगावर पडल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रावेत गावातील मस्के वस्ती ते मुकाई चौकाकडे जाणार्‍या रोडवरील के व्हीले बिल्डिंग समोर शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडली.

ऋषभ दीपक पोफळे (वय २९, रा. भुगाव, ता. मुळशी) आणि रामहरी धर्मा साठे (वय ५१, रा. लोहगाव) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अ‍ॅड. दीपक सिताराम पोफळे (वय ५२, रा. भुगाव ता. मुळशी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महावितरणच्या देहुरोड सेक्शनचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा ऋषभ पोफळे व रामहरी साठे हे कामावर जात होते. मुकाई चौकाकडे मोटारसायकलवरुन जात असताना रोडवरुन जाणारी महावितरणची २२ केव्हीची लाईनची तार तुटून ती ऋषभ याच्या अंगावर पडल्याने वीजेचा धक्का दोघांना बसला. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी इलेक्ट्रीक लाईनची व्यवस्थित देखभाल न केल्याने निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चाटे तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed