Pune Pimpri Chinchwad Crime News | लघुशंका करताना हटकल्याने चुलत भावाने लोखंडी रॉड डोक्यात घालून जीवे मारण्याचा केला प्रयत्न

marhan

मी दोन खून केले आहेत, म्हणत गावात पसरवली दहशत

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | घरासमोर लघुशंका करत असताना हटकल्याने त्याच्या रागातून चुलत भावाने घरात शिरुन आपल्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). मी दोन खून केले आहेत, असे म्हणत कोयाळी गावात दहशत पसरविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी (Alandi Police) तिघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DAdXfp-CcAx

संतोष लहु काळे, शालन लहु काळे आणि बाई शिवाजी कोळेकर (सर्व रा. कोयाळी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संपत अकुंश काळे (वय ३०, रा. कोयाळी, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोयाळी गावातील काळे वस्ती येथे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली.

https://www.instagram.com/p/DAdVpIrCH93

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे जवळ जवळ रहात असून चुलत भाऊ आहेत. संतोष काळे हा मोटारसायकलवरुन घेऊन फिर्यादीच्या पत्नीसमोर लघुशंका करत होता. त्यामुळे त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला हटकले. त्यावर त्याने फिर्यादी व त्यांचा भाऊ भानुदास अंकुश काळे यांना उद्देशुन म्हणाला की ‘‘मी दोन खून केले आहेत, आणि आता मला तुम्हाला दोघांना जीवे ठार मारायचे आहे,’’ असे म्हणून फिर्यादीचे मागे घरात शिरला. फिर्यादीला म्हणाला की तुला आता कायमचे संपवतो.

https://www.instagram.com/p/DAdT7L8p7Oj

त्यानंतर हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीचे डोक्यात, तोंडावर, ओठावर मारुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचा भाऊ भानुदास हा फिर्यादीला सोडविण्यासाठी आला असताना त्याला सुद्धा संतोष याने घरासमोरील पडलेले दगडांनी मारुन जखमी केले. शालन व बाई यांनी शिवीगाळ केली. शालन हिने दगडाने व बाई हिने लाकडी दांडक्याने भानुदास याला मारहाण केली. संतोष याने हातातील लोखंडी रॉड हवेत फिरवत ‘‘मी दोन खून केलेले आहेत. तुम्हाला मी उद्याचा दिवस बघु देणार नाही, आजची रात्र ही तुमची शेवटची रात्र आहे. माझे नादाला कोणी कोयाळी गावात लागत नाही. मी कोण आहे तुम्हाला दाखवतो.’’असे मोठमोठ्या आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक दुधमल तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAdRtjGihkL

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)

You may have missed