Pune Pimpri Chinchwad Crime News | गर्भपात करण्यासाठी गोळ्या खाण्यास दिल्याने अति रक्तस्त्राव होऊन विवाहितेचा मृत्यु; पतीला अटक

Abortion

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | गावाकडील महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने पत्नीचा मानसिक व शारीरीक छळ केला. ती गर्भवती असल्याचे समजल्यावर तिचा गर्भपात होण्यासाठी गोळ्या खाण्यास दिल्या. त्यातून अति रक्तस्त्राव होऊन विवाहितेचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) पतीला अटक केली आहे.

शिवराज मन्नाप्पा राठोड (वय ३१, रा. सोनापुरता तांडा, ता. सोरापूर, जि. यादगीर, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन धर्मानायक चव्हाण (वय २१, रा. बैलापुरतांडा, ता. सोरापूर, जि. यादगीर, कर्नाटक) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील मोई गावात ५ सप्टेबर रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे (वय २७) शिवराज राठोड याच्याबरोबर २०२१ मध्ये विवाह झाला होता. शिवराज याचे गावाकडील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून तो फिर्यादीच्या बहिणीस कोणत्या ना कोणत्या कारणावरुन शिवीगाळ करुन उपाशी पोटी ठेवत. माहेरहून खर्चासाठी पैसे व सोने घेऊन येण्याचा तगादा लावून तिचा शारीरीक व मानसिक छळ करत असे. कर्नाटकातील गावाहून ते खेड तालुक्यातील मोई गावी आले. फिर्यादी यांची बहिण दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे त्याला समजले. तेव्हा त्याने गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिला गर्भस्त्राव होण्याच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यातून तिला अति रक्तस्त्राव होऊन त्यात तिचा मृत्य झाला. पोलीस उपनिरीक्षक जायभाये तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed