Pune Pimpri Crime News | मोटारसायकलची टेस्ट तरुणाला पडली महागात; चोरट्याने मोटारसायकल घेऊन ठोकली धुम
पिंपरी : Pune Pimpri Crime News | ओ एल एक्स वर मोटारसायकल विक्रीच्या जाहिरातीला (Advertisement On OLX) प्रतिसाद देऊन एक तरुण गाडी पाहण्यासाठी आला़ तरुणाने त्याला गाडीवर काही अंतर फिरविले. त्यानंतर त्याने मी चालवून पहातो, असे सांगून मोटारसायकल घेऊन त्याने धुम ठोकली.
याबाबत राजेश वासुदेव पदमणे (वय २९, रा. कडाची वाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम पवार नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पल्सर मोटारसायकल विकण्याची जाहिरात ओ एल एक्स अॅपवर केली होती. तिला शुभम पवार नावाच्या तरुणाने प्रतिसाद देऊन संपर्क साधला होता. तो मोटारसायकल विकत घ्यायला तयार होता. फिर्यादी यांनी त्याला मोटारसायकलचे फोटो, आर सी बुकचे फोटो पाठवले. त्यानंतर २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तो चाकण बस स्टँडवर आला. तेथे फिर्यादीही आले.
फिर्यादी व आरोपी हे मोटारसायकलवरुन आळंदी फाटा रोडने घाटाचे मार्गे गेले.
वाटेत शुभम पवार हा फिर्यादी यांना मोटारसायकल चालवून बघायची आहे, असे म्हणाला.
फिर्यादी यांनी मोटारसायकल त्याला चालवायला दिली. ते रस्त्याच्या कडेला थांबले.
शुभम पवार हा चालवायला म्हणून मोटारसायकल घेऊन गेला तो परत आलाच नाही.
त्यांनी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. पोलीस हवालदार भोसले तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु