Pune Pimpri Crime News | भारत – दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणार्यांवर छापा टाकून पिंपरी पोलिसांनी केला तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : Pune Pimpri Crime News | भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसर्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेवर दणदणीत विजय मिळविला. या सामन्यादरम्यान बेटिंग घेणार्यांवर छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार मोहसीन रमजान शेख यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भावेश प्रदिप लखवानी Bhavesh Pradeep Lakhwani (वय २५, रा. विजय अपार्टमेंट, धनराज सोसायटीसमोर, पिंपरी) त्याचे साथीदार पांडे (वय ४०, रा. पिंपरी), किरण (वय ४०, रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिंपरी येथेील वाघेरे पार्क सोसायटी समोरील बाळगोपाळ शाळेचे समोर ६ डिसेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिसांना भावेश लखवानी हा क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. भारत – दक्षिण अफ्रिका यांच्यात शनिवारी एक दिवसीय सामना रंगात आला असताना पोलिसांना भावेश लखवानी हा वाघेरे पार्क सोसायटीसमोर असल्याची माहिती खबर्यांनी दिली. त्या बातमीनुसार पोलिसांनी तेथे जाऊन भावेश लखवानी याला पकडले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात तो भारत – दक्षिण अफ्रिका सामन्यावर मोबाईल फोनद्वारे बोली स्वीकारुन बेटिंग घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडील १ लाख रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे तपास करीत आहेत.
