Pune Pimpri Crime News | मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या स्पा मॅनेजरला अटक करुन 3 तरुणीची केली सुटका (Video)
पुणे : Pune Pimpri Crime News | मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या रिच फिल स्पावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलिसांनी छापा घालून ३ तरुणींची सुटका करुन स्पा मॅनेजरला अटक केली आहे.
अक्षय महादेव सुतार Akshaya Mahadev Sutar (वय २६, रा. काळभोर पाटील कॉलनी, साईनाथनगर, निगडी, मुळ रा. दुर्गेवाडी वसाहत, कोडोलीगाव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे स्पा मॅनेजरचे नाव आहे.
संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी येथील सम्राट चौक येथील रिच फिल स्पा येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली. त्यावरुन सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे व पथकाने रिच फिल स्पा येथे छापा टाकला़ वेश्यागमनासाठी वापर करण्यात येणार्या ३ तरुणींची सुटका केली. स्पा मालक मयुर दिनेश मोहिते (वय २६, रा. दिघी) व स्पा मॅनेजर अक्षय सुतार यांच्यावर गुुन्हा दाखल करुन अक्षय सुतार याला अटक केली.
या वर्षात अवैध वेश्या व्यवसाय करणार्या ८ ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली. त्यात ६ मसाज पार्लर/स्पा, २ हॉटेल यांचा समावेश आहे. या ८ गुन्ह्यात २० आरोपींना अटक केली असून १७ महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांनी मागील ३ वर्षामध्ये सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात मसाज पार्लर/स्पा, हॉटेल, लॉज व रहिवासी ठिकाणांचे आडून अवैधरित्या वेश्या व्यवसाय करणार्या एकूण २९ आस्थापना १ वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याबाबत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आदेश दिले आहे. २०२६ मध्ये ३ आस्थापना १ वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे, सहायक पोलीस फौजदार सुनिल शिरसाट, पोलीस हवालदार भगवंता मुठे, गणेश कारोटे, श्रद्धा भरगुडे, वैष्णवी गावडे, निलम बुचडे, संगितला जाधव, उदयकुमार भोसले यांनी केली आहे.
