Pune PMC Elections 2025-2026 | पुण्यातील दिग्गज माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’

Pune PMC Elections 2025-2026 | Veteran former corporators of Pune join BJP; 22 former corporators get 'Kamal'

पुणे : Pune PMC Elections 2025-2026 | शहराच्या राजकारणात मोठी हालचाल घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेवक बाळा धनकवडे, माजी नगरसेविका सायली वांजळे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांतील २२ माजी नगरसेवक आणि पदाधिकारी रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

हा पक्षप्रवेश मुंबईतील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता होणार असून, पुण्यातील भाजपचे प्रमुख नेतेही या वेळी उपस्थित राहणार आहेत. खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांतील माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हा प्रवेश छोटेखानी कार्यक्रमात पार पडणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयाची शक्यता वाढल्याचा अंदाज बांधत इतर पक्षांतील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे इच्छुकांची भेटीगाठी वाढल्या आहेत. शुक्रवारी मोहोळ यांनी अनेक इच्छुकांना वेळ दिल्याने जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात दिवसभर मोठी गर्दी झाल्याचेही बोलले जात आहे.

धक्कादायक नावेही?

पुणे शहरातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही धक्कादायक नावेही या पक्षप्रवेशात असल्याची चर्चा आहे. ही नावे प्रत्यक्ष प्रवेशानंतरच जाहीर केली जातील, असे सांगण्यात येत आहे. काही नेत्यांचा प्रवेश रविवारी तर आणखी काही प्रवेश येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, धनकवडीतील माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते.

You may have missed