Pune PMC Elections | संवादातून विकासाचा मार्ग ठरवणारी पदयात्रा ! प्रभाग ०३ मधील भाजपा-आरपीआय महायुतीच्या पदयात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
पुणे : Pune PMC Elections | “लोकप्रतिनिधी दैनंदिन आयुष्यात नागरिकांसोबत उभे राहणारे हवेत. पदयात्रांमधून नागरिकांशी होणारा थेट संवाद हा विकासाचा खरा पाया ठरतोय. कागदावरचा विकास नाही तर प्रत्यक्षात असणारा विकास करणे, हेच आमचे ध्येय आहे”, असे मत प्रभाग क्रमांक ०३ मधील भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले. कटकेवाडी ते रॉयल पार्क परिसरात शुकवारी (ता. ०९) काढण्यात आलेल्या पदयात्रेत त्या बोलत होत्या.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०३ मधील उमेदवारांनी कटकेवाडी मुख्य चौक येथून पदयात्रेस सुरुवात केली. ही पदयात्रा जगताप वस्ती, हिंदवी पार्क, गुलमोहर पार्क मार्गे रॉयल पार्क परिसरात समाप्त झाली. पदयात्रेत नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील रोजच्या अडचणी, मूलभूत सुविधा यांबाबत चर्चा झाली. प्रत्येक भागातील प्रश्न वेगळे असले तरी अपेक्षा नियोजनबद्ध व विश्वासार्ह विकासाची आहे, हे लक्षात येते.
“नागरिकांनी मांडलेल्या सूचना व अपेक्षा लक्षात घेऊन प्रभागाचा विकास आराखडा अधिक मजबूत करण्याचा निर्धार आमचा आहे”, अशा विश्वास डॉ. श्रेयस प्रितम खांदवे यांनी व्यक्त केला.
पदयात्रेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभताना दिसत आहे. अ गटातील डॉ. श्रेयस प्रितम खांदवे, ब गटातील अनिल दिलीप सातव, क गटातील ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, ड गटातील रामदास दत्तात्रय दाभाडे यांच्यासह भाजपा-आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
