Pune PMC Elections | बालेवाडी गावभेट : अमोल बालवडकरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक ९ मधील बालेवाडी गावठाण परिसरात अमोल बालवडकर यांनी गावभेट देत मायबाप जनतेशी थेट संवाद साधला. भैरवनाथसह इतर मंदिरांमध्ये दर्शन घेऊन या गावभेटीची सुरुवात झाली. त्यानंतर घराघरांतून मिळालेला प्रतिसाद भावूक करणारा ठरला.
गावठाणातील नागरिकांनी अमोल बालवडकर यांचे औक्षण करून, आशीर्वाद देत, मिठी मारून उत्साहाने स्वागत केले. “अमोल, तू लढ… आम्ही तुझ्या सोबत आहोत,” असे ठाम शब्द नागरिकांकडून व्यक्त झाले. घराघरांत दिसणारा उत्साह आणि मनामनातील आपुलकीने संपूर्ण परिसर भारावून गेला.
या भेटीदरम्यान मिळालेला विश्वास, ऊर्जा आणि माया याच बळावर प्रभागाच्या विकासाला आणखी गती देण्याचा निर्धार अधिक दृढ झाल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले. “नागरिकांनी दाखवलेला हा विश्वासच माझी खरी ताकद आहे; तोच मला प्रत्येक पावलावर पुढे जाण्याची ऊर्जा देतो,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून गायत्री मेढे-कोकाटे (अ गट), बाबुराव चांदेरे (ब गट), पार्वती निम्हण (क गट) आणि अमोल बालवडकर (ड गट) निवडणूक रिंगणात आहेत.
