Pune PMC Elections | ‘बोपोडीचा केवळ स्मार्ट नव्हे तर आरोग्यपूर्ण विकासही’; भाजपा उमेदवार सनी विनायक निम्हण यांची ग्वाही
पुणे : Pune PMC Elections | बोपोडी परिसराचा विकास केवळ स्मार्टच नव्हे, तर आरोग्यपूर्ण जीवनशैलीपर्यंत विस्तृत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीच्या उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी दिली.
बोपोडी परिसरात काढलेल्या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी बोलताना बोलताना निम्हण यांनी हा आश्वास दिला. यावेळी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निम्हण म्हणाले की, बोपोडी परिसरात सुसज्ज अंतर्गत रस्ते, पदपथ, उद्याने आणि क्रीडांगणे यांसारखी स्मार्ट शहरातील आवश्यक साधने तर सुरू केली जातील, परंतु त्याचबरोबर नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा, स्वच्छ हवा, सुरक्षित आणि शुद्ध पाणी, तसेच कचऱ्याचे योग्य नियोजन यांना प्राधान्य दिले जाईल. त्यांच्या मते, आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित वातावरण हेच खरा नगर विकासाचा पाया आहे.
माझे राजकारण विभाजनाचे नाही, माझे राजकारण विश्वासाचे, विकासाचे आहे. कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांचे संस्कार माझ्यावर आहेत, यामुळे या निवडणुकी दरम्यान दिलेली सर्व आश्वासने प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी मी जबाबदार असेल. विकासाच्या कामांसाठी 100 दिवसांचा ठोस कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल आणि त्याची नियमित प्रगती नागरिकांसमोर सादर केली जाईल, असेही ते म्हणाले.
