Pune PMC Elections | प्रचाराचा समारोप नागरिकांच्या भेटीतून; प्रभाग ०३ मधील भाजपा-आरपीआय उमेदवारांचा नागरिकांशी संवाद

Pune PMC Elections | Campaign concludes with meeting with citizens; BJP-RPI candidates from Ward 03 interact with citizens

पुणे: Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी (ता. १३) प्रभाग क्रमांक ०३ (विमाननगर-लोहगाव) मधील भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांनी ग्रीन पार्क, कलवड, डिफेन्स कॉलनी व फॉर्च्युन सिटी या भागांमध्ये दुपारपर्यंत नागरिकांच्या भेटी घेतल्या.

भेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा, सूचना व प्रश्न ऐकून घेण्यात आले. प्रचाराच्या संपूर्ण कालावधीत मिळालेले प्रेम, पाठिंबा व मार्गदर्शनाबद्दल उमेदवारांनी प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानले.

यावेळी अ गटातील श्रेयस प्रितम खांदवे, ब गटातील अनिल दिलीप सातव, क गटातील ऐश्वर्या सुरेंद्र पठारे व ड गटातील रामदास दत्तात्रय दाभाडे यांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवर्जून सांगितले.

You may have missed