Pune PMC Elections | हर्षवर्धन दीपक मानकर: कोपरा सभेत प्रभाग 11 मधील विकासकामांचा आढावा, उमेदवारांची समस्यांच्या निराकरणाची ग्वाही

Pune PMC Elections | Harshvardhan Deepak Mankar: Review of development works in Ward 11 in Kopra Sabha, candidates assure of resolution of problems

कोथरूड : Pune PMC Elections |  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त काल पिनाक सदिच्छा, भक्तीयोग सोसायटी, रामबाग कॉलनी, तसेच श्रीराम कॉलनी, लेन नंबर ८, सुतारदरा अशा विविध ठिकाणी पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे यांच्या उपस्थितीत कोपरा सभा उत्साहात पार पडल्या.

 या कोपरा सभांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि आगामी विकासकामांवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रभाग क्रमांक ११ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार श्री. हर्षवर्धन दीपक मानकर, सौ. तृप्ती निलेश शिंदे आणि सौ. कांता नवनाथ खिलारे यांनी या सभांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांची नोंद घेत, त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याची ग्वाही उमेदवारांनी दिली.

पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, सोसायटी भागाची सुरक्षा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, पथदिवे तसेच आरोग्य व शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर विशेष भर देण्यात आला.

मागील पंचवार्षिक कालावधीत प्रभागात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा या बैठकांमध्ये घेण्यात आला. रस्ते सुधारणा, जलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती आणि सोसायटी भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या कामांमुळे परिसराच्या एकूण विकासाला चालना मिळाल्याचे उमेदवारांनी नमूद केले.

यावेळी नागरिकांनीही आपली मते मांडत अपेक्षा व्यक्त केल्या. भविष्यात प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कोपरा सभेमुळे थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.