Pune PMC Elections | प्रभाग क्र. 9 मध्ये जनसंवाद; अमोल बालवडकर यांचा वीरभद्र नगर कॉलनीत नागरिकांशी थेट संवाद
पुणे: Pune PMC Elections | आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमोल बालवडकर यांनी वीरभद्र नगर कॉलनी येथे भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या वेळी दैनंदिन समस्या, नागरी सुविधा, सुरक्षितता, वाहतूक तसेच भविष्यातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या. प्रभागातील प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची भूमिका आणि वेळोवेळी घेतलेल्या पुढाकारामुळे नागरिकांचा अमोल बालवडकर यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
आतापर्यंत केलेली विकासकामे, सातत्याने राखलेला जनसंवाद आणि पारदर्शक कार्यपद्धती यामुळे येत्या निवडणुकीत अमोल बालवडकर आणि त्यांच्या सहकारी उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. नागरिकांचा हा विश्वास आमच्यासाठी मोठे बळ असून, संपूर्ण प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करत राहू, असा विश्वास अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला.
