Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्रमांक 9 मधील साहिल सेनेरी सोसायटीत अमोल बालवडकर यांचा नागरिकांशी मनमोकळा संवाद; नागरिक म्हणाले – ‘आमचा पाठिंबा सदैव तुमच्यासोबतच राहील’

Amol Balwadkar

पुणे : Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक ९ मधील साहिल सेनेरी सोसायटीत अमोल बालवडकर यांनी भेट देत नागरिकांशी उत्स्फूर्त आणि मनमोकळा संवाद साधला. या भेटीदरम्यान पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीतील नागरिकांनी स्पष्टपणे पाठिंबा दर्शवला.

नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर या चौघांनाही मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले.

“प्रभागातील विकासकामे आणि अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम पाहता आमचा पाठिंबा सदैव तुमच्यासोबतच राहील,” असा आत्मविश्वास नागरिकांनी व्यक्त केला. या प्रेमळ आणि प्रामाणिक प्रतिसादातून प्रभागात आतापर्यंत केलेल्या कामांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले. नागरिकांचा विश्वास आणि आपुलकीची साथ पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

You may have missed