Pune PMC Elections | पुणे : लोकप्रतिनिधी जबाबदार व्यवस्थापक असायला हवा; पदयात्रेच्या माध्यमातून ऐश्वर्या पठारे यांची भूमिका
पुणे : Pune PMC Elections | “लोकप्रतिनिधी म्हणजे एखाद्या निवडणुकीपुरता चेहरा नसायला पाहिजे. जनतेच्या दैनंदिन मूलभूत सुविधांच्या संदर्भाने असलेल्या समस्यांवर उपाय शोधणारा जबाबदार व्यवस्थापक असायला पाहिजे”, या स्पष्ट व परिणामाभिमुख भूमिका ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी बुधवार (ता. ०७) रोजी झालेल्या पदयात्रेच्या निमित्ताने व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ०३ मधील भाजपा-आरपीआयचे उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे (क गट), डॉ. श्रेयस प्रितम खांदवे (अ गट), अनिल दिलीप सातव (ब गट) व रामदास दत्तात्रय दाभाडे (ड गट) यांची सकाळी व संध्याकाळी दोन टप्प्यांत यशस्वीरीत्या पार पडली. सकाळी वाघेश्वर नगर येथून पदयात्रेची सुरुवात झाली. लोहगाव रस्ता चौक, गोरे वस्ती, देशमुख वस्ती, जाधव वस्ती परिसरातून मार्गक्रमण करत ही पदयात्रा सुयोग नगर परिसरात समाप्त झाली.
संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यात पंकजा आसमन सोसायटी येथून पदयात्रा सुरू झाली. शुभ मंगल कार्यालय, शिक्षक कॉलनी, संत नगरमधील सर्व लेन, इंद्रायणी विहार मार्गे ही पदयात्रा मारुती नगर परिसरात पूर्ण झाली.
पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा, शिक्षण आणि मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या व सूचना जाणून घेण्यात आल्या.
“विकास हा नियोजन, वेळेचे पालन व अंमलबजावणीवर उभा असतो. नागरिकांचा वेळ, विश्वास व अपेक्षा यांचा आदर ठेवून काम करणारा लोकप्रतिनिधीच खरा बदल घडवू शकतो,” असेही ऐश्वर्या पठारे यांनी यावेळी सांगितले.
या पदयात्रेतून लोकांशी संवाद, विश्वास आणि उत्तरदायित्व या तीन आधारस्तंभांवर उभा असलेला विकासाचा दृष्टिकोन विमाननगर-लोहगाव परिसरात प्रभावीपणे मांडण्यात आला, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होताना दिसली.
