Pune PMC Elections | पुणे : सुस येथे बीबीएसएम आयोजित खेळाडू स्नेहमेळावा उत्साहात; प्रभाग ९ मधील क्रीडा चळवळीला नवी दिशा; खेळाडूंचा अमोल बालवडकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांना पाठिंबा

Amol Balwadkar (1)

पुणे : Pune PMC Elections | सुस येथे बीबीएसएमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला खेळाडू स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात प्रभाग क्रमांक ९ मधील क्रीडा चळवळीला नवसंजीवनी देणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.

प्रभागात राबवण्यात आलेल्या दूरदृष्टीपूर्ण क्रीडा धोरणामुळे क्रीडांगणे, मैदाने, सराव सुविधा तसेच विविध स्पर्धांना सातत्याने प्रोत्साहन मिळत असून, त्यामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्नेहमेळाव्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, पार्वती निम्हण, बाबुराव चांदेरे तसेच अमोल बालवडकर उपस्थित होते.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ मध्ये राबवण्यात आलेल्या क्रीडानिष्ठ व खेळाडू-केंद्रित धोरणाबद्दल समाधान व्यक्त करत खेळाडूंनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जाहीर पाठिंबा दिला. येत्या १५ जानेवारी रोजी घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून पक्षाच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा ठाम निर्धार खेळाडूंनी व्यक्त केला.

You may have missed