Pune PMC Elections | पुणे : कोथरूडमध्ये भाजपला धक्का; 2 नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, अमोल बालवडकरांनी फोडले भाजपाचे 2 नेते

Amol Balwadkar

पुणे : Pune PMC Elections | कोथरूडमधील माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने डावललेले आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले युवा नेते अमोल बालवडकर यांनी भाजपला आणखी एक धक्का दिला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आबासाहेब सुतार आणि युवा नेते शिवम आबासाहेब सुतार यांनी भारतीय जनता पार्टीला राम राम ठोकत, अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करून अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

या प्रवेशप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार गायत्री कोकाटे-मेढे, पार्वती निम्हण आणि अजय निम्हण उपस्थित होते. कोथरूडमधील या राजकीय घडामोडीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आले आहे.

You may have missed