Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोपरा सभेला नागरिकांचा, विशेषतः महिला भगिनींचा उत्स्फूर्त; हर्षवर्धन दीपक मानकर यांना पसंती
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मोठ्या जल्लोषात सुरु असून प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर प्रभागाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर , तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे पहायला मिळत आहे. प्रभागातील बाल युवक मित्र मंडळ, सुदर्शन क्रिकेट क्लब, हनुमाननगर तसेच शिवसाई मित्र मंडळ, सुतारदरा परिसरातील मतदारांशी कोपरा सभेद्वारे संवाद साधून संपूर्ण पनेल हे घरोघरी पोहोचण्यात यशस्वी होत आहेत. या कोपरा सभेला नागरिकांचा, विशेषतः महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सर्वांशी परिसरातील विविध प्रश्न, अपेक्षा आणि सूचनांवर मनमोकळ्या वातावरणात चर्चा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाग क्रमांक ११ (अ) रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागाचा उमेदवार म्हणून श्री. हर्षवर्धन दीपक मानकर यांनी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, महिला सुरक्षेचे प्रश्न तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत भूमिका आणि पुढील काळातील विकासकामांच्या संकल्पाबाबतची भूमिका यावेळी मांडली. प्रभागाचा सर्वांगीण विकास, नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे आणि महिलांसह सर्व घटकांना न्याय देणारे सक्षम नेतृत्व निर्माण करण्यासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना देण्याचे आवाहन यावेळी पनेलच्या उमेदवारांनी केले.
हर्षवर्धन मानकर यांच्या पदयात्रांचा, कोपरा सभा प्रचाराचा सहज कानोसा घेतला तर नागरिकांच्या समस्या सोडवत असतानाच, त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या आवश्यक सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील, यावर त्यांनी भर दिला आहे. या समस्या सुटाव्यात यासाठी नागरिकांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रभागातील नागरिकांनी हर्षवर्धन दीपक मानकर यांच्याबद्दल अतिशय आपुलकी असून २४ तास उपलब्ध असणारा आणि नागरिकांचे काम करणारा नगरसेवक आम्हाला हवा आहे, असे मत नागरिक व्यक्त करताना दिसतात. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच या परिसरातील व्यापारी, उद्योगपती, खेळाडू, महिला, युवाशक्ती यांच्याशी सतत संपर्कात राहणारा, वृद्ध नागरिकांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्याप्रमाणे केलेली विकासकामे, योजनांचा लाभ मिळवून देणे हे देखील नागरिक उत्साहाने आणि आपलेपणाने बोलून दाखवत आहेत.
