Pune PMC Elections | पुणे : प्रभाग 4 खराडी परिसरात भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
पुणे : Pune PMC Elections | खराडी परिसरातील एकनाथ पठारे वस्ती, दत्त मंदिर चौक येथे भाजपा च्या प्रचाराला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने खराडी परिसरात भेट देत भाजपाच्या चारही उमेदवारांनी येथील रहिवाशांशी थेट संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान नागरिकांनी परिसरातील दैनंदिन प्रश्न, अडचणी तसेच भविष्यात अपेक्षित असलेल्या सुविधा याबाबत स्पष्टपणे आपली मते मांडली.
आगामी काळात कोणत्या विकासकामांना प्राधान्य द्यावे, सोसायटी स्तरावर कोणत्या सुविधा अधिक प्रभावीपणे राबवता येतील, यावर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि अपेक्षा नोंदवून घेण्यात आल्या असून, त्या सोडवण्यासाठी ठोस आणि कालबद्ध कृती आराखडा तयार केला जाईल, असा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.
चारही उमेदवारांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन समस्या, विकासाच्या गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या. पाणी, रस्ते, स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस आणि वेळेत निर्णय घेणे हीच भाजपा ची ओळख असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात आले.
प्रभाग क्र. ४ खराडी-वाघोली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार
प्रभाग क्र. ४ (अ) – शैलजित जयवंत बनसोडे (अनुसूचित जाती पुरुष-अ)
प्रभाग क्र. ४ (ब) – रत्नमाला संदिप सातव (नागरिकांचा मागास प्रवर्ग-ब)
प्रभाग क्र. ४ (क) – तृप्ती संतोष भरणे (सर्वसाधारण महिला-क)
प्रभाग क्र. ४ (ड) – सुरेंद्र बापूसाहेब पठारे (सर्वसाधारण पुरुष-ड)
