Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर यांच्या पदयात्रा व कोपरा सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : Pune PMC Elections | महानगरपालिका प्रभाग क्र. 11 अंतर्गत रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रा व कोपरा सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सभांच्या माध्यमातून उमेदवार व पदाधिकारी थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत.
शिव प्रतिष्ठान मित्रमंडळ, त्रिमूर्ती मित्रमंडळ, राजीव गांधी पार्क (एआरएआय रोड) येथे कोपरा सभा पार पडल्या. तसेच सुतारदरा, क्रांतिसेना मित्रमंडळ, दत्तनगर आदी भागांत पदयात्रा काढण्यात आल्या. यावेळी तृप्ती निलेश शिंदे व कांता नवनाथ खिलारे यांनीही नागरिकांशी संवाद साधला.
प्रभागातील कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, मूलभूत सोयी तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित विविध समस्या नागरिकांनी मांडल्या. उमेदवारांनी या सर्व प्रश्नांची नोंद घेत त्यांचे निराकरण प्राधान्याने करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की, “प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, पारदर्शक कारभार राखणे आणि सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या विश्वासावर आणि सहकार्यावर प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”
