Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 9 मधील म्हाळुंगे येथे राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य पदयात्रा; अमोल बालवडकर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे: Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 9 मधील म्हाळुंगे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करत पदयात्रेचे उत्साहात स्वागत केले. पदयात्रेदरम्यान अमोल बालवडकर यांनी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अपेक्षांवर थेट संवाद साधला.
या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर स्वतः उपस्थित होते. चौघांनीही घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत जनतेचा विश्वास अधिक दृढ केला.
यावेळी शांताराम पाडाळे (पोलीस पाटील), वामनराव कोळेकर, निलेश पाडाळे, सोपानराव खैरे, सुखदेव कोळेकर, विजय कोळेकर, नामदेवराव गोलांडे, युवराज कोळेकर, हरिश्चंद्र गायकवाड, जितेंद्र कोळेकर, राहुल दादा, किसन पारदे, काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे, नंदकुमार पाडाळे, समीर कोळेकर, किसनराव सुतार, हरिश्चंद्र पाडाळे, रामराव पाडाळे, ज्ञानेश्वर पाडाळे, मनोज पाडाळे, धनराज निकाळजे, आनंदराव कांबळे, प्रकाश तात्या आणि अनिल तात्या यांची उपस्थिती होती.
