Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार अमोल बालवडकर यांना सोसायट्यांमधून मोठे बळ मिळत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले
पुणे : पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राबवण्यात आलेल्या जनसंवाद दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध सोसायट्यांना दिलेल्या भेटींमुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून, थेट सोसायटी स्तरावर जाऊन नागरिकांच्या अडचणी ऐकून घेण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आला.
या जनसंवाद दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. विकासकामे, नागरी सुविधा आणि भविष्यातील गरजा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विकासाचा आढावा व नागरिकांचे प्रश्न
सोसायटी भेटीदरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज आणि इतर मूलभूत सुविधांबाबत आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रलंबित प्रश्न आणि दैनंदिन अडचणी नागरिकांनी मोकळेपणाने मांडल्या.
कालबद्ध कृती आराखड्याचा निर्धार
आगामी काळात कोणत्या विकासकामांना प्राधान्य द्यावे आणि सोसायटी स्तरावर कोणत्या सुविधा अधिक प्रभावीपणे राबवता येतील, यावर चर्चा झाली. नागरिकांच्या सूचना नोंदवून ठोस व कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.
सोसायटी स्तरावर विश्वासाचे वातावरण
ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पुढील काळात नियमित संवाद, फीडबॅक मीटिंग्स आणि समस्या निवारणासाठी थेट संपर्क ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले. या दौऱ्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी उमेदवारांची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
