Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 09 मध्ये राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांचा बालेवाडीतील नागरिकांशी सुसंवाद; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune PMC Elections | Pune: NCP's Amol Balwadkar interacts with the citizens of Balewadi in Ward No. 09; Spontaneous response from the citizens

पुणे : Pune PMC Elections | महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 09 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर यांनी बालेवाडी येथील प्राईम डोमस सोसायटीला भेट देत रहिवाशांशी सुसंवाद साधला.

https://www.instagram.com/p/DTXMBc8CcNf

या भेटीदरम्यान सोसायटीतील दैनंदिन नागरी प्रश्न, पायाभूत सुविधा, परिसरातील वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षिततेसंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षा वैशालीताई कमाजदार उपस्थित होत्या.

संवादादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर यांनी बालेवाडी परिसराच्या नियोजित विकासासाठी आपली दिशा, प्राधान्यक्रम आणि कार्यपद्धती नागरिकांसमोर मांडली. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

सोसायटीतील नागरिकांनी केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारी आणि सातत्याने संपर्कात राहणारी भूमिका सकारात्मक असल्याची भावना व्यक्त केली.

नागरिकांच्या सहकार्याने प्राईम डोमस सोसायटीसह संपूर्ण बालेवाडी परिसराचा समतोल, सुरक्षित आणि शाश्वत विकास साधण्यासाठी पुढील काळात अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करत राहण्याचा ठाम निर्धार अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला.