Pune PMC Elections | पुणे: प्रभाग क्र. 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचार; शानुर रशीद शेख यांचा घराघरांत जनसंवाद
पुणे: Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक २२ मधील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तसेच आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख यांचे सुपुत्र शानुर रशीद शेख यांनी डाइस प्लॉट, यासीन जुग आणि मंत्री इस्टेट परिसरात काल जोरदार राजकीय प्रचार केला.
या प्रचारादरम्यान शानुर शेख यांनी घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. स्थानिक समस्या, नागरी सुविधा, तसेच विकासकामांबाबत नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या गेल्या आणि भविष्यातील विकासासाठी ठोस आश्वासने देण्यात आली.
या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचारात सहभाग नोंदवला. आगामी महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याचे चित्र या परिसरात पाहायला मिळाले.
