Pune PMC Elections | पुणे : ‘मला निवडणुकी पासून लांब ठेवण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत’; प्रभाग क्रमांक 39 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार बापू नायर (Video)
पुणे : Pune PMC Elections | सत्ताधारीच्या विरोधात लोकांचा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागल्याने मला निवडणुकीतून बाजूला करण्याचा कट केला आहे. मला पाठिंबा देणार्या लोकांना नोटीसा पाठवल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापू नायर यांनी केला आहे.
प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर इंदिरानगर मधील उमेदवार बापू नायर यांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. याबाबत बापू नायर यांनी सांगितले की, प्रभागातील समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत. उघडी गटारे, रस्त्यावरून वाहणारा मैला पाणी याचा सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरसेवकांकडे तक्रार करायला गेले की ते २ -२ तास तास बसवून ठेवतात. नंतर सांगतात की, हे माझे काम नाही. तुम्ही पालिकेत जा, पोलिसांकडे जा, असे सांगून लोकांना पळवून लावले जाते. त्यामुळे मला प्रभागातील लोकांचा वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. हे पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. मला पाठिंबा देणार्याना पोलिसांच्या नोटीसा येऊ लागल्या आहेत. ज्यांच्यावर एकही केस नाही त्यांना ही पोलिस नोटीसा पाठवत आहेत. पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केल्यावर तुमच्यावर एकही केस नाही तर नोटीस कधी आली, असे उलट मतदारांना विचारणा केली जात आहे.
असे असले तरी बहुसंख्य त्रस्त मतदार सांगतात की, आम्हाला कितीही त्रास होऊ देत, आम्ही आता मागे हटणार नाही, अगदी रात्री १० वाजेपर्यंत लोक आरत्या घेऊन आमची वाट पहात असतात.
गेली १५ दिवस ग्राऊंड लेव्हलला फिरतो आहे. खुप वाईट परिस्थिती आहे. हे सर्व पाहिल्यावर ‘हे नगरसेवक आहेत की भक्षक आहेत,’ असा प्रश्न पडतो. यांना थोडी पण लाज वाटत नाही. अनेकांच्या नळाला मैलायुक्त पाणी येते. त्यामुळे लोकांना बदल हवा आहे. त्यामुळेच मला लोकांचा वाढता पाठिंबा मिळु लागला असल्याचे सांगून बापू नायर म्हणाले की, लोकांना फोन करुन धमकाविले जात आहे. मला पाठिंबा देणार्या लोकांना पोलिसांच्या थेट नोटिसा येऊ लागल्या आहेत. ज्यांच्यावर एकही केस नाही, त्यांनाही या नोटिसा पाठविल्या जात आहे. त्यांच्यावर नोटिसा पाठवून दबाव आणला जात आहे. पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केली तर तुम्हाला कशी नोटीस मिळाली, असा उलट प्रश्न केला जातो. आमच्यावर सर्व बाजूने दबाव आणून आमच्याकडून काही कृती होते का याची वाट पहात आहे. जेणे करुन मला निवडणुकीतून बाजूला करता येईल. पण, आम्ही शांततेने आणि सयंमाने या सर्व बाबींना तोंड देत निवडणुक लढवत आहोत.
आमचे व्हिजन
प्रभागातील आम्ही चारही उमेदवारांनी एकत्रितपणे १०० स्थानिक लोकांची यादी करणार आहोत. त्यांच्या मार्फत नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यात येणार आहे. गुन्हेगारीपासून लहान मुलांना परावृत्त करणे, परिसर साफ राहण्याची योजना तयार केली आहे. सोसायटी भागात आज झाडुवाले जात नाही. सर्वांना निवडणुकीच्या कामाला लावले आहे. ते मतदार याद्या वाटत फिरत आहे.
परिसरात नाला आहे. त्याला पायवाट बनवायची आहे. माझे सोसायटीमधील मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी केवळ सोसायटीचा विचार करु नये. झोपडपट्ट्यांमध्ये सुविधा मिळाल्या तर त्याचा सोसायट्यांनाही उपयोग होतो.
मी गुन्हेगार आहे, असे विरोधक सांगतात. पण, त्यांच्यावरही केसेस आहेत. माझ्यासारखा माणूस जर गुन्हेगारीपासून मुक्त होऊन मुख्य प्रवाहात येऊ पहात आहे, तर त्याला विरोध का?
गुन्हेगारीकडे वळणार्या सर्वांना माझे आवाहन आहे की, एकदा गुन्हा दाखल झाला की खूप वाईट दिवस काढावे लागतात. खूप फरफट होते. लहान मुले गुन्हेगारीकडे वळताना दिसतात, त्यांना माझे एकच सांगणे आहे की, हे क्षेत्र खूप खराब आहे. चांगला विचार करा. आईवडिलांची सेवा करा. पत्नी मुलांची काळजी घ्या, त्यातच सुख आहे.
