Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 03 मधील भाजपच्या उच्चशिक्षीत उमेदवार ऐश्वर्या पठारे यांच्या प्रचार रॅली व पदयात्रांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग
पुणे : Pune PMC Elections | प्रभाग क्र. 03 मधील भाजपच्या उच्चशिक्षीत उमेदवार ऐश्वर्या पठारे यांच्या प्रचार रॅली व पदयात्रांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला आहे. परिवर्तन घडवू शकणाऱ्या महिला उमेदवाराला मतदार जोरदार पाठिंबा देताना दिसत आहेत.
प्रभाग क्र. 03 मधील सर्व प्रचार रॅली आणि पदयात्रांमध्ये महिलांचा लक्षणीय आणि वाढता सहभाग दिसून येत आहे. अनेक महिला मतदारांनी एकत्र येत त्या महिला उमेदवाराला ठाम पाठिंबा दिला आहे, जिच्या नेतृत्वामुळे प्रभागाचे चित्र बदलू शकते असा त्यांचा विश्वास आहे. महिलांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, “आमच्या प्रश्नांसाठी आमचाच आवाज” अशी भावना ठळकपणे पुढे येत आहे.
‘सखी प्रेरणा मंच’- महिलांनी महिलांसाठी उभे केलेले व्यासपीठ
याच पार्श्वभूमीवर ‘सखी प्रेरणा मंच’ हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेले एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून पुढे आले आहे. प्रभाग क्र. ०३ मधील भाजपच्या उच्चशिक्षीत उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांच्या नेतृत्वाखालील या मंचाला आज १० हजारांहून अधिक महिला सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. हे व्यासपीठ महिलांना त्यांच्या आवाजाला दिशा देण्याचे काम करत असून, महिलांना त्यांच्या आनंद, शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगार तसेच अनेक सामाजिक मुद्द्यांवर खुलेपणाने बोलण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी सक्षम करत आहे.
