Pune PMC Elections | पुणे – प्रभाग 09 : माऊली गार्डन सोसायटीत अमोल बालवडकर यांचा नागरिकांशी संवाद; राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सर्वतोपरी पाठबळ

Pune PMC Elections | Pune - Ward 09: Amol Balwadkar Engages with Residents at Mauli Garden Society; Strong Support for NCP Candidates

पुणे : Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ०९ मधील बाणेर येथील माऊली गार्डन सोसायटीत अमोल बालवडकर यांनी भेट देत रहिवाशांशी सुसंवाद साधला. या भेटीत पाणीपुरवठ्याची नियमितता, अंतर्गत रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, तसेच वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी यांसह दैनंदिन नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

या संवादावेळी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षा वैशाली कमाजदार उपस्थित होत्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर यांनी बाणेर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठीची दृष्टी, प्राधान्यक्रम आणि आगामी कृती आराखडा नागरिकांसमोर मांडला. केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याची भूमिका स्पष्ट करत, येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. माऊली गार्डनसह संपूर्ण बाणेर परिसराचा सुयोग्य, सुरक्षित व नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकहितकेंद्रित कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

You may have missed