Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्रमांक 09 – राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर यांच्या सुस गावमधील पदयात्रेला मायबाप जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद! (Video)

Pune PMC Elections | Pune: Ward No. 09 - Spontaneous response of the people of Mayabap to the padyatra of NCP candidate Amol Balwadkar in Sus village! (Video)

पुणे : Pune PMC Elections |  प्रभाग क्रमांक 09 – राष्ट्रवादीचे उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, पार्वती निम्हण, बाबुराव चांदेरे व अमोल बालवडकर यांच्या सुस गावमधील पदयात्रेला मायबाप जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भगवती नगर ते भैरवनाथ मंदिरपर्यंत फुलांचा वर्षाव, घोषणाबाजी आणि मोठ्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते. या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे–कोकाटे, पार्वती निम्हण, बाबुराव चांदेरे व अमोल बालवडकर उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/DTUiK9oCdNd

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सुस येथे भेट देत येथील रहिवाशांशी थेट संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान नागरिकांनी परिसरातील दैनंदिन प्रश्न, सोसायटीसमोरील अडचणी तसेच भविष्यात अपेक्षित असलेल्या सुविधा याबाबत स्पष्टपणे आपली मते मांडली.

आगामी काळात कोणत्या विकासकामांना प्राधान्य द्यावे, सोसायटी स्तरावर कोणत्या सुविधा अधिक प्रभावीपणे राबवता येतील, यावर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि अपेक्षा नोंदवून घेण्यात आल्या असून, त्या सोडवण्यासाठी ठोस आणि कालबद्ध कृती आराखडा तयार केला जाईल, असा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.

You may have missed