Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्रमांक 17 – भाजप उमेदवारांचा महत्त्वाकांक्षी विकास अजेंडा; वाहतूक, स्वच्छता, महिला सुरक्षितता व शिक्षणावर विशेष भर

Pune PMC Elections | Pune: Ward No. 17 - BJP candidates' ambitious development agenda; Special emphasis on transport, cleanliness, women's safety and education

पुणे : Pune PMC Elections | जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. हडपसरमधील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी हडपसर-यवत उड्डाणपूल उभारण्याचा ठाम संकल्प भाजप सरकारने केला आहे. यासोबतच पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक व सीएनजी बसची संख्या वाढविणे, तसेच पर्यायी रस्त्यांसाठी भुयारी मार्गांचे जाळे उभारण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती भाजप उमेदवारांनी दिली.

रामटेकडी-माळवाडी-वैदूवाडी येथील प्रभाग क्रमांक १७ मधील भाजप उमेदवार प्रशांतमामा तुपे, शुभांगी किरण होले-शिवरकर, पायल विराज तुपे आणि खंडू सतीश लोंढे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत विकासाचा आराखडा मांडत मतदानाचे आवाहन केले.

उमेदवारांनी सांगितले की, सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येतील. इरिगेशनच्या जमिनी सार्वजनिक वापरासाठी खुल्या केल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग, तसेच ई-वाहनांसाठी चार्जिंग नेटवर्क विकसित केले जाईल. वैदूवाडी, रामटेकडी आणि गोसावी वस्ती परिसरात जनसंवाद साधून नागरिकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.

या वेळी संतोष अण्णा खरात, शेख संतोष कदम, काशिनाथ गायकवाड, प्रदीप पवार, अप्पाराव गायकवाड, लखन गवळी, राहुल गायकवाड, राहुल बनसोडे, मशाख शेख, अजीम शेख, अतिक शेख, नारायण इनामदार, राहुल राऊत, भाऊसाहेब नांदगुडे, श्याम पाटील, अनिल दौंडकर, सतीश गायकवाड, रुपेश मोरे, दत्ता मस्के, योगेश कोकरे, शक्तीसिंग कल्याणी, महादू झिपरे, विशाल नेटके, संकेत शिंदे, करण खरात, विनोद खवले, हरपल महादेव चव्हाण, बापू शेडगे, सुनील दिवटे, रवी शंकर तुपे, रासकर अण्णा, मगर, मते आदी उपस्थित होते.

या जनसंवाद कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed