Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्रमांक 22 : “सर्वांगीण विकास करत झोपडपट्टी धारकांना हक्काची घरे देणार” – अजित पवार
पुणे : Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक २२, भवानी पेठ येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “सर्वांगीण विकास करत झोपडपट्टी धारकांना हक्काची घरे देणार” असा ठाम विश्वास व्यक्त केला. या सभेला माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख यांचे सुपुत्र व उमेदवार शानूर राशीद शेख यांच्या प्रचारासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
अजित पवार यांनी बोलताना भवानी पेठ परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. विकास हा सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवूनच होईल असे स्पष्ट करत झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घरे देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उमेदवार शानूर राशीद शेख यांनीही नागरिकांशी संवाद साधत प्रभाग २२ चा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्याची ग्वाही दिली. सभेला उपस्थित नागरिकांनी जोरदार प्रतिसाद देत घोषणाबाजी केली.
या जाहीर सभेमुळे प्रभाग २२, भवानी पेठ येथील निवडणूक प्रचाराला वेग मिळाला असून राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
