Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 9 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या उपस्थितीत ‘विजयी संकल्प सभा’ रविवारी
पुणे: Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपावरून रंगलेलं नाराजीनाट्य, चर्चा, बैठका, युती यामुळे ही निवडणूक चर्चेची ठरत आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. प्रभाग क्रमांक ९ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प सभा रविवार (दि.४) धनकुडे फार्म समोर, ज्युपिटर हॉस्पिटल जवळ, बाणेर येथे सायंकाळी ठीक ७:०० वाजता पार पडणार आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये बाणेर- बालेवाडी, पाषाण-सुस, म्हाळुंगे, सुतारवाडी,सोमेश्वरवाडी या भागांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण, अमोल बालवडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी आयोजित भव्य कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात प्रभाग क्रमांक ९ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे (अ गट), बाबुराव चांदेरे (ब गट), पार्वती निम्हण (क गट) आणि अमोल बालवडकर (ड गट) यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर अधिक ताकदीने लढवण्याचा ठाम संकल्प करण्यात आला होता.
