Pune PMC Elections | प्रभाग 9 मध्ये अमोल बालवडकरांचा प्रचार वेगात; कोपरसभा, प्रचारफेऱ्या व बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : Pune PMC Elections | प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमोल बालवडकर यांच्या कोपरसभा, प्रचारफेऱ्या आणि बैठकांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील प्रचारादरम्यान मतदारांचा वाढता विश्वास दिसून येत असल्याचे बालवडकर यांनी सांगितले.
“आता चित्र बदलले आहे. आम्ही मतदारांकडे जातोच, पण अनेक ठिकाणी मतदारच स्वतःहून भेटीसाठी येत आहेत. हा विश्वास आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
भेटीगाठी व जनसंपर्क कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मूलभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणासंबंधी थेट प्रश्न उपस्थित केले. यावर बालवडकर यांनी विकासकामांत सातत्य, पारदर्शकता आणि वेळेत अंमलबजावणी यांना प्राधान्य देत पुढील टप्प्यांचा आराखडा मांडला. “हा केवळ प्रचार नाही, तर नागरिक-प्रतिनिधी विश्वासाचा संवाद आहे,” असेही ते म्हणाले.
