Pune PMC Elections | पुणे-प्रभाग क्र. 9 : अमोल बालवडकर यांच्यासाठी समर्थकांची भूमिका; सुस–म्हाळुंगेतील कार्यकर्त्यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीत प्रवेश

Pune PMC Elections | Supporters take a stand for Amol Balwadkar; workers from Sus–Mhalunge quit BJP and join NCP

पुणे : Pune PMC Elections | प्रभाग क्र. 9 मधील बाणेर येथे आयोजित ‘विजयी संकल्प’ सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुस–म्हाळुंगे परिसरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.

अमोल बालवडकर यांना उमेदवारी नाकारल्याने सुस–म्हाळुंगे गावातील त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवरील कामकाज, संघटन क्षमता आणि नागरिकांशी असलेला सातत्यपूर्ण संवाद पाहता तिकीट नाकारण्याचा निर्णय समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे आम्ही ठाम भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पक्षप्रवेशामुळे सुस–म्हाळुंगे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पक्षप्रवेश करणाऱ्यांची नावे :-

कल्पना नामदेव चांदेरे, अंजनाताई चांदेरे, नलिनी उत्तम ससार (मा. सरपंच, सुस गाव), मीनाताई बाळासाहेब ससार, अंजनाताई जालिंदर चांदेरे, प्रीती युवराज ढेगे, विजय व्यवहारे, चंद्रशेखर पाटील, प्रमोद निरखने, सोमनाथ चांदेरे, नंदू साळुंखे, बालू भाऊ तापकीर, संदीप बांदल, दिलीप चांदेरे, सुनील शिंदे, संतोष जाधव, गौरव रूद्रकंठवार, संतोष सावेगावकर, राम चितळे, योगेश पडोळे, निखिल चांदेरे, मोरे शेखर, आकाश ससार, ओमकार ससार, उमेश ससार, सिद्धांत ससार, बलकवडे, सचिन चांदेरे, निखिल ससार, सौरभ चांदेरे, अक्षय मुंडे, नीलेश गाडीकर आदी.