Pune PMC Elections | नागरिकांच्या भेटीगाठी घेत विकासाची दिशा स्पष्ट; प्रभाग 04 मधील भाजपा-आरपीआय उमेदवारांचा प्रचार दौरा संपन्न

Pune PMC Elections | The direction of development is clear by meeting the citizens; The campaign tour of BJP-RPI candidates in Ward 04 has concluded

पुणे : Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०४ मधील भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांनी विविध सोसायट्यांमध्ये भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. ऐश्वर्या लक्ष्मी, गणेश हाइट्स, रेनबो ग्लोरी, प्रेस्टिज पार्क, तारा तरंग तसेच ऑक्सी इव्हॉल्व, जेल सोसायटी, क्षितिज रेसिडेन्सी व परिसरात उमेदवारांनी रहिवाशांच्या भेटी घेतल्या.

यावेळी नागरिकांनी मांडलेल्या रोजच्या अडचणी, विकासाच्या अपेक्षा तसेच परिसरातील गरजा उमेदवारांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. लोककेंद्रित, नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले.

यावेळी अ गटातील शैलजीत जयवंत बनसोडे, ब गटातील रत्नमाला संदीप सातव, क गटातील तृप्ती संतोष भरणे आणि ड गटातील सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी एकत्रितपणे सांगितले की, “प्रभाग ०४ चा विकास हा पारदर्शक, संतुलित व भविष्यमुख पद्धतीने केला जाईल. नागरिकांच्या सहभागातूनच मजबूत लोकशाही आणि सक्षम प्रभाग घडतो”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेवटी उमेदवारांनी येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळ देण्याचे व विकासासाठी योग्य नेतृत्वाला पाठिंबा देण्याचे आवाहन नागरिकांना केले.

You may have missed